भेंडीची भाजी ही बहुतेक सगळ्यांना आवडते. भरली भेंडी किंवा फ्राय केलेली भेंडी आपल्याला माहित असते. Dr. Aniruddha Joshi उर्फ सद्गुरु बापूंनी १३ डिसेंबर २०१४ च्या 'self - health' च्या सेमीनार मधे आपल्या health संबंधित अनेक गोष्टींबद्दल उलगडा केला. तेव्हापासून आपण तेलाचा वापर सतर्कपणे करू लागलो. साखरेमधून (Fructose मधून ) होणारे अपाय आपल्या लक्षात आले आणि आपण साखरेऐवजी dextrose वापरायला लागलो. बापूंच्या ह्या सेमीनारने आपली लाईफ स्टाईल हळूहळू बदलत गेली आणि अधिकाधिक healthy व्हायला लागली . कमीत कमी तेलामध्ये किंवा तेलाशिवाय भाजी बनवायची सगळे प्रयास करायला लागले, नवनवीन recipes try करायला लागले. तशीच मी पण केलेली झिरो ऑईल भेंडीची recipe आपण बघू.
भेंडी म्हंटले की थोडे तरी तेल आलेच, त्याशिवाय भाजी होणार कशी असे आपल्याला वाटते, पण तेलाशिवाय देखील भेंडीची भाजी बनविता येते आणि ती चविष्ट देखील लागते.
ही भाजी कशी बनवायची ते आपण बघू.
(२ जणांसाठी)
साहित्य -
१/४ किलो भेंडी
१ मोठा कापलेला कांदा
१ कापलेला टोमेटो
कोकम किंवा चिंच
चवीनुसार मीठ, तिखट
कृती :-
प्रथम भेंडीचे दोन उभे काप करून घ्यायचे. कुकर मध्ये मोहरी व थोडेसे हिंग घालून कुकर थोडा गरम करून घ्यायचा. मग कापलेला कांदा कुकर मध्ये टाकून लगेच थोडेसे मीठ टाकावे. म्हणजे कांद्याला लगेच पाणी सुटते आणि कांदा खाली लागणार नाही. कांदा परतून गुलाबीसर झाला की मग कापलेला टोमेटो टाकावा. थोडासा परतून मग उभी कापलेली भेंडी टाकावी मग चवीनुसार तिखट, गरम मसाला टाकवा. त्यावर थोडी कोकम आगळ किंवा चिंच टाकावी म्हणजे थोडासा आंबटपणा येईल. थोडेसे पाणी घालावे म्हणजे भेंडी करपणार नाही. भाजी एकदा नीट ढवळून कुकरचे झाकण लावून एक शिटी घ्यावी.
झाली भाजी तयार …!
Waah Masst... Will try surely
ReplyDeleteDo you have cabbage recipe which Bapu explained during his health related pravachan?
ReplyDeleteYess.
DeleteSuperb, ambadnya.
ReplyDeletevery nice recipe...i will surely try it.
ReplyDeleteIt's very nice, simple ,less time consuming , healthy & mouthwatering too.
ReplyDelete