Showing posts with label इतर काही …. Show all posts
Showing posts with label इतर काही …. Show all posts

Tuesday, January 12, 2016

वर्धमान व्रताधिराजसाठी सांबार मसाला रेसिपी


नवीन वर्ष सुरु झाले की श्रद्धावान स्त्रियांना वेध लागतात ते मकरसंक्रातीचे, वर्षातून एकदाच होणाऱ्या मंगलचंडिका प्रपत्तीचे. या दिवशी आपण जेवणात इतर कुठली भाजी न बनविता फक्त सांबारच बनवितो.  बहुतेक वेळा प्रपत्तीच्या दिवशी आपले वर्धमान व्रत चालूच असते त्यामुळे सांबर करताना बाहेरचा सांबार मसाला वापरणे अडचणीचे ठरते म्हणून या वर्षी ही खास घरगुती सांबार मसाला रेसिपी आपण बघूया. 


साहित्य - मूग डाळ - २ चमचे,
           उडीद डाळ -२ चमचे, 
           धने - १ वाटी, 
           लाल मिरची - १ वाटी , 
           जिरे -  २ चमचे, 
           मोहरी -  २ चमचे, 
           मेथ्या -  १ चमचे,
           हिंग, तेल 

कृती -  तेलामध्ये मूग डाळ, उडीद डाळ, धने, लाल मिरची, जिरे, मोहरी , मेथ्या, हे सर्व वेगवेगळे तळून घ्यावे. ते थंड करावे. थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून त्याची पावडर बनवावी. 
तयार झालेला मसाला घालून आपण स्वादिष्ट सांबर बनवू शकतो. 

टीप - इतर दिवशी यामध्ये २ चमचे तूर डाळ देखील तळून मिक्स करू शकतो.



Wednesday, December 23, 2015

झिरो ऑईल भेंडी

भेंडीची भाजी ही बहुतेक सगळ्यांना आवडते. भरली भेंडी किंवा फ्राय केलेली भेंडी आपल्याला माहित असते.  Dr. Aniruddha Joshi उर्फ सद्गुरु बापूंनी १३ डिसेंबर २०१४ च्या 'self - health' च्या सेमीनार मधे आपल्या health संबंधित अनेक गोष्टींबद्दल उलगडा केला. तेव्हापासून आपण तेलाचा वापर सतर्कपणे करू लागलो.  साखरेमधून (Fructose मधून ) होणारे अपाय आपल्या लक्षात आले आणि आपण  साखरेऐवजी  dextrose वापरायला लागलो.  बापूंच्या ह्या सेमीनारने आपली लाईफ स्टाईल हळूहळू बदलत गेली आणि अधिकाधिक healthy व्हायला लागली . कमीत कमी तेलामध्ये किंवा तेलाशिवाय भाजी बनवायची सगळे प्रयास करायला लागले, नवनवीन recipes try करायला लागले. तशीच मी पण केलेली झिरो ऑईल भेंडीची recipe आपण बघू. 

भेंडी म्हंटले की थोडे तरी तेल आलेच, त्याशिवाय भाजी होणार कशी असे आपल्याला वाटते, पण तेलाशिवाय देखील भेंडीची भाजी बनविता येते आणि ती चविष्ट देखील लागते. 

ही भाजी कशी बनवायची ते आपण बघू. 

(२ जणांसाठी)
साहित्य -  
१/४  किलो भेंडी 
१ मोठा कापलेला कांदा 
१ कापलेला टोमेटो 
कोकम किंवा चिंच 
चवीनुसार मीठ, तिखट  

कृती :- 


प्रथम भेंडीचे दोन उभे काप करून घ्यायचे. कुकर मध्ये मोहरी व थोडेसे हिंग घालून कुकर थोडा गरम करून घ्यायचा. मग कापलेला कांदा कुकर मध्ये टाकून लगेच थोडेसे मीठ टाकावे. म्हणजे कांद्याला लगेच पाणी सुटते आणि कांदा खाली लागणार नाही. कांदा परतून गुलाबीसर झाला की मग कापलेला टोमेटो टाकावा. थोडासा परतून मग उभी कापलेली भेंडी टाकावी मग चवीनुसार तिखट, गरम मसाला टाकवा. त्यावर थोडी कोकम आगळ किंवा चिंच टाकावी म्हणजे थोडासा आंबटपणा येईल. थोडेसे पाणी घालावे म्हणजे भेंडी करपणार नाही. भाजी एकदा नीट ढवळून कुकरचे झाकण लावून एक शिटी घ्यावी. 

झाली भाजी तयार …!    


Friday, August 2, 2013

मराठी ची "दुनियादारी"


सध्या box office वर सुपरहीट चाललेला "दुनियादारी" चित्रपटाने रसिकांवर भलतीच जादू केली आहे. चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या यशस्वी चित्रपटांनंतर संजय जाधव यांचा दुनियादारी या  चित्रपटला ही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.   सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या पुस्तकावर आधारित असा हा चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय, पण  १५ दिवस होऊन देखील हा चित्रपट अजूनही सगळीकडे House Full आहे. खर सांगायचं तर या कादंबरीवर चित्रपट सादर करायचा हे मोठं आव्हान. मात्र हे आव्हान दिग्दर्शक संजय जाधव यांनी समर्थपणे पेलल्याचं "दुनियादारी' चित्रपटात सिद्ध होतं. 

हा चित्रपट म्हणजे कॉलेज, कट्टा आणि धमाल या सगळ्यांचा एकत्रित मेळ. याची कथा  ही मुख्यत: मैत्रीवर आधारित आहे,  मैत्रीतूनच धमाल, मजा, मस्ती करत त्यातील प्रेमकथा फुलत जाते.  कादंबरीतील 70 ते 80 च्या दशकातील वातावरण, कलाकारांचे गेटअप चांगले उभारण्यात आले आहे.  ब्रेकअप के बाद फेम ब्रॅन्ड, पंकज पडघन आणि अमितराज यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलंय. तरुणांना रुचेल असे सुंदर संगीत त्यांनी दिलंय. यातील  "टिक टिक वाजते डोक्यात" आणि "देवा तुझ्या गाभाऱ्याला" हि गाणी रसिकांच्या मनाला फारच भिडलेली आहेत.  विशेष म्हणजे या चित्रपटाचे शिर्षक गीत सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश  चौधरी, स्वप्निल जोशी या आघाडीच्या अकरा कलाकारांनी गायलेले आहे. 

स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि  सई ताम्हणकर हे या चित्रपटातील खास मोहरे. त्यांचा अभिनय तर नेहमीप्रमाणेच उत्तम झालाय. तसेच बाकी कलाकारांचा अभिनय ही सुंदर आहे. उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनिस  यांनीही त्यांना दिलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय.

त्यामुळे जर कॉलेजचे दिवस, त्यावेळची धमाल, कट्ट्यावर केलेली मजा, मस्ती जर पुन्हा एकदा अनुभवायची असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

निर्माता - ड्रीमिंग ट्‌वेंटीफोर सेव्हन निर्मित 
दिग्दर्शक - संजय जाधव
कथा - सुहास शिरवळकर
पटकथा संवाद - चिन्मय मांडलेकर
भूमिका - स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ऊर्मिला कानेटकर, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, सुशांत शेलार