Showing posts with label Shree Aniruddha Upasana Fondation. Show all posts
Showing posts with label Shree Aniruddha Upasana Fondation. Show all posts

Tuesday, February 10, 2015

आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन

रविवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आत्मबलच्या १५ व्या पुष्पाचे स्नेहसंमेलन झाले. अर्थातच अप्रतिम कार्यक्रम झाला. सुरुवातीलाच अनसूयामातेच्या आश्रमातील scene बघून अतिशय प्रसन्न वाटले. भन्नाट 3D effects दिले होते. त्यानंतरचा गणपतीच्या मुंजीचा scene एकदम live वाटला. नंतरची Smart, Me Me ani Mich, Wake up, Aadnya ही सगळी  नाटकं एक से एक झाली. Popcorn jokes मुळे हसून हसून आमची वाट लागली.  आई आपल्याला प्रत्येक नाटकातून काहीतरी शिकवत असते. बापू आपल्याला प्रवचनातून जे जे सांगतात त्याची आठवण करून देत असते. शेवटी आईच ती, सतत आपल्या भल्याचाच  विचार करत असते. 

प्रत्येक नाटकातून, डान्समधून आईची आणि तिच्या लेकींची अफाट मेहनत दिसून येत होती. फिनाले मधले  3D effects जबरदस्त होते आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. आणि ते शब्द तर अजून कानातच आहेत. 

"I Love U My Dad Forever & U Are Always Their With Your Mother."  


अंबज्ञ नंदाई एवढा सुंदर आनंद , एवढे सुंदर क्षण आम्हाला दिल्याबद्दल. 






Monday, February 11, 2013

आत्मबल प्रोग्राम - १४ वे पुष्प




हरी ओम 


काल रविवारी आत्मबलचा १४ व्या पुष्पाचा प्रोग्राम हरीगुरुग्राम येथे परमपूज्य  बापू, नंदाई व सुचित मामा ह्यांच्या उपस्थितीत पार पडला . खरोखरच अतिशय अप्रतिम अवर्णनीय होता. ह्यामध्ये काही नव्हते असे नाही कॉमेडी पण होती , इमोशनल पण होत तर त्यात वीर रस पण होता, प्रत्येक सखीचा उत्साह, प्रत्यक्ष बापुंसमोर आपण शो करत आहोत ह्याचा आनंद ओसंडून वाहत होता. फक्त नंदाईच एवढी ताकद तिच्या बाळांना  देऊ शकते. सावधान, मुहूर्त, पगडा ह्यांसारख्या नाटकातून आई करमणूक करता करता आपल्यासाठी काही ना काही मेसेज देत होती, 
पहिला मोठी आईच्या गाण्यावर बसावीलेला डान्स, मयुर डान्स  डोळे दिपवणारा होता, जाहिरातीवर केलेल्या विनोदांमुळे हसून हसून डोळ्यातून पाणी काढले, नो एक्सप्रेशन डान्स  अतिशय विनोदी पण आगळा वेगळा ही होता.
आणि ह्या कार्यक्रमाचा शेवट...  त्याला तर काही शब्दच नाहीत स्पीचलेस! अत्यंत भावपूर्ण होता, तिथला प्रत्येक जण बापूंच्या प्रेमाने भारावून गेला होता, असे वाटत होते ह्याला शेवटच नसावा. 
आणि हो ह्याच्या पलीकडे स्क्रीनवर जे ईफेक्टस ते तर भन्नाट होते. अर्थातच, ह्या सगळ्यामागे आई आणि तिच्या प्रेमापोटी  तिच्या बाळांनी घेतेलेले अथक परिश्रम दिसत होते.

खरच, आई तू ग्रेट आहेस आणि फक्त तूच तुझ्या बाळांकडून अशक्य ते शक्य करू शकतेस. तुझ्या प्रेमाला अंत नाही.

we Love you AAI Always,
मी अंबज्ञ आहे.


हरी ओम 




















Thursday, February 7, 2013

साईंनिवास – डाक्यूमेंट्री

"वानर मज करावे देवा नको नरजन्म कुडा, नव्हता विकार त्यांच्या ठायी विचार फक्त रामाचा ...."

मीनावैनीनी रचलेला माझा सगळ्यात आवडीचा अभंग. आपण आजपर्यंत मीनावैनीबद्दल खूप काही ऐकले आहे. त्यांनी रचलेले अभंग पण ऐकले आहे. पण त्यांचा पूर्ण प्रवास आणि त्यांनी केलेले बापुंवरील अतोनात प्रेम आपल्याला ह्या "साई निवास" ह्या सी. डी. मधून अनुभवायचे भाग्य आपल्याला लाभत आहे. सद्य पीपा (आप्‍पासाहेब दाभोलकर) आणि चेतनसिंह दाभोलकर ह्यांनी अप्रतिमरित्या माहिती सांगून ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहे. ही सी. डी आपल्याला मराठी व हिंदी (डब केलेली) भाषेतून श्रीहरिगुरुग्राम, श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम व उपासना केंद्रावर मिळेल. 


http://www.aniruddhafriend-samirsinh.com/sai-niwas-documentary/