हरी ओम
काल रविवारी आत्मबलचा १४ व्या
पुष्पाचा प्रोग्राम हरीगुरुग्राम येथे परमपूज्य बापू, नंदाई व सुचित मामा
ह्यांच्या उपस्थितीत पार पडला . खरोखरच अतिशय अप्रतिम अवर्णनीय होता. ह्यामध्ये काही
नव्हते असे नाही कॉमेडी पण होती , इमोशनल पण होत तर त्यात वीर रस पण होता,
प्रत्येक सखीचा उत्साह, प्रत्यक्ष बापुंसमोर आपण शो करत आहोत ह्याचा आनंद
ओसंडून वाहत होता. फक्त नंदाईच एवढी ताकद तिच्या बाळांना देऊ शकते. सावधान,
मुहूर्त, पगडा ह्यांसारख्या नाटकातून आई करमणूक करता करता आपल्यासाठी काही ना काही मेसेज
देत होती,
पहिला मोठी आईच्या गाण्यावर बसावीलेला डान्स, मयुर डान्स डोळे
दिपवणारा होता, जाहिरातीवर केलेल्या विनोदांमुळे हसून हसून डोळ्यातून पाणी काढले, नो
एक्सप्रेशन डान्स अतिशय विनोदी पण आगळा वेगळा ही होता.
आणि ह्या कार्यक्रमाचा शेवट...
त्याला तर काही शब्दच नाहीत स्पीचलेस! अत्यंत भावपूर्ण होता, तिथला प्रत्येक
जण बापूंच्या प्रेमाने भारावून गेला होता, असे वाटत होते ह्याला शेवटच नसावा.
आणि हो ह्याच्या पलीकडे स्क्रीनवर
जे ईफेक्टस ते तर भन्नाट होते. अर्थातच, ह्या सगळ्यामागे आई आणि तिच्या प्रेमापोटी
तिच्या बाळांनी घेतेलेले अथक परिश्रम दिसत होते.
खरच, आई तू ग्रेट आहेस आणि फक्त
तूच तुझ्या बाळांकडून अशक्य ते शक्य करू शकतेस. तुझ्या प्रेमाला अंत नाही.
we Love you AAI Always,
मी
अंबज्ञ आहे.
हरी
ओम
Short & Nice! AMBADNYA...
ReplyDelete