Wednesday, August 7, 2013

आता दे विश्रांती तुझ्यापायी…. मीनावहिनी दाभोलकर

हरी ओम 


थकले रे बापू  ऒढीता संसार 
आता दे विश्रांती तुझ्यापायी बापू 
आता दे विश्रांती तुझ्यापायी…. 



"अखंड सौभाग्यवती वज्रचुडे मंडिता पुण्यश्र्लोक मीनावहिनी गोविंद दाभोलकर" यांचे आज दहावे पुण्यस्मरण. बापूंवर अपंरपार प्रेम करणाऱ्या मीनावहीनी बापुंपायी आज विलीन झाल्या. 

"साई निवास" च्या डीव्हीडी मध्ये आपण बघतोच अनेक श्रद्धावान, बापूंवर कसे प्रेम करायचे हे त्यांच्याकडून शिकले. मीनावहिनीनी बापूंवर रचलेले अभंग सुद्धा आपल्या काळजाला भिडतात, ते ऐकताना आपल्या मनात देखील बापुंबद्दल प्रेम दाटून येते. 

खरंच बापू भक्तीमध्ये मीनावहिनी आपल्याला आदर्श घालून दिला. आपणही त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयास करून उत्तम वानसैनिक बनू या. 


Friday, August 2, 2013

मराठी ची "दुनियादारी"


सध्या box office वर सुपरहीट चाललेला "दुनियादारी" चित्रपटाने रसिकांवर भलतीच जादू केली आहे. चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या यशस्वी चित्रपटांनंतर संजय जाधव यांचा दुनियादारी या  चित्रपटला ही प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.   सुहास शिरवाळकर यांच्या ‘दुनियादारी’ या पुस्तकावर आधारित असा हा चित्रपट १९ जुलैला रिलीज झालाय, पण  १५ दिवस होऊन देखील हा चित्रपट अजूनही सगळीकडे House Full आहे. खर सांगायचं तर या कादंबरीवर चित्रपट सादर करायचा हे मोठं आव्हान. मात्र हे आव्हान दिग्दर्शक संजय जाधव यांनी समर्थपणे पेलल्याचं "दुनियादारी' चित्रपटात सिद्ध होतं. 

हा चित्रपट म्हणजे कॉलेज, कट्टा आणि धमाल या सगळ्यांचा एकत्रित मेळ. याची कथा  ही मुख्यत: मैत्रीवर आधारित आहे,  मैत्रीतूनच धमाल, मजा, मस्ती करत त्यातील प्रेमकथा फुलत जाते.  कादंबरीतील 70 ते 80 च्या दशकातील वातावरण, कलाकारांचे गेटअप चांगले उभारण्यात आले आहे.  ब्रेकअप के बाद फेम ब्रॅन्ड, पंकज पडघन आणि अमितराज यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलंय. तरुणांना रुचेल असे सुंदर संगीत त्यांनी दिलंय. यातील  "टिक टिक वाजते डोक्यात" आणि "देवा तुझ्या गाभाऱ्याला" हि गाणी रसिकांच्या मनाला फारच भिडलेली आहेत.  विशेष म्हणजे या चित्रपटाचे शिर्षक गीत सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश  चौधरी, स्वप्निल जोशी या आघाडीच्या अकरा कलाकारांनी गायलेले आहे. 

स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि  सई ताम्हणकर हे या चित्रपटातील खास मोहरे. त्यांचा अभिनय तर नेहमीप्रमाणेच उत्तम झालाय. तसेच बाकी कलाकारांचा अभिनय ही सुंदर आहे. उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनिस  यांनीही त्यांना दिलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय.

त्यामुळे जर कॉलेजचे दिवस, त्यावेळची धमाल, कट्ट्यावर केलेली मजा, मस्ती जर पुन्हा एकदा अनुभवायची असेल तर हा चित्रपट नक्की पाहा. कारण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 

निर्माता - ड्रीमिंग ट्‌वेंटीफोर सेव्हन निर्मित 
दिग्दर्शक - संजय जाधव
कथा - सुहास शिरवळकर
पटकथा संवाद - चिन्मय मांडलेकर
भूमिका - स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ऊर्मिला कानेटकर, वर्षा उसगावकर, उदय टिकेकर, सुशांत शेलार