नवीन वर्ष सुरु झाले की श्रद्धावान स्त्रियांना वेध लागतात ते मकरसंक्रातीचे, वर्षातून एकदाच होणाऱ्या मंगलचंडिका प्रपत्तीचे. या दिवशी आपण जेवणात इतर कुठली भाजी न बनविता फक्त सांबारच बनवितो. बहुतेक वेळा प्रपत्तीच्या दिवशी आपले वर्धमान व्रत चालूच असते त्यामुळे सांबर करताना बाहेरचा सांबार मसाला वापरणे अडचणीचे ठरते म्हणून या वर्षी ही खास घरगुती सांबार मसाला रेसिपी आपण बघूया.
साहित्य - मूग डाळ - २ चमचे,
उडीद डाळ -२ चमचे,
धने - १ वाटी,
लाल मिरची - १ वाटी ,
जिरे - २ चमचे,
मोहरी - २ चमचे,
मेथ्या - १ चमचे,
हिंग, तेल
कृती - तेलामध्ये मूग डाळ, उडीद डाळ, धने, लाल मिरची, जिरे, मोहरी , मेथ्या, हे सर्व वेगवेगळे तळून घ्यावे. ते थंड करावे. थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून त्याची पावडर बनवावी.
तयार झालेला मसाला घालून आपण स्वादिष्ट सांबर बनवू शकतो.
टीप - इतर दिवशी यामध्ये २ चमचे तूर डाळ देखील तळून मिक्स करू शकतो.