मागील भागात आपण गुगल सर्च इंजिन कसे काम करते? हे बघितले, सर्च इंजिनच्या अल्गोरिदमची ओळख करून घेतली, आता आपण त्यांचे प्रकार बघू,
'अल्गोरिदम' ही concept आपल्यासाठी खूपच महत्वाची आहे. कुठल्याही कार्यामध्ये अल्गोरिदम हा खूप महत्वाचा घटक असतो त्याप्रमाणे गुगल सर्च इंजिन देखील ह्या अल्गोरिदम्स वरच काम करते. प्रत्येक वेब पेजला त्याच्या गुणवत्तेनुसार गुगल ranking देत असते आणि हे ranking देण्याचे अत्यंत महत्वाचे काम अल्गोरीदम्स करत असतात. ह्या अल्गोरीदम्सना गुगलचा 'ब्रेन' असे संबोधिले जाते.
गुगलच्या सध्याच्या उपडेट नुसार गुगल वेब वर ६० ट्रिलियन पेजेसचे इंडेक्सिंग झाले आहे आणि सतत वाढतच राहणार. युसर्सच्या सोयीसाठी त्यांचे इंजीनीर्स सतत नवीन प्रोग्राम ट्राय करत असतात त्यामुळे गुगल वर्षाला ५०० -६०० वेळा तरी त्यांचे अल्गोरीदम्स बदलत असतात.
म्हणजेच थोडक्यात सर्च इंजिनवर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि qualitative result दाखवायचे काम हे अल्गोरिदम्स करतात.
अल्गोरिदम्सचे थोडक्यात प्रकार आपण बघू,
गुगल सर्च इंजिन हे १९९८ साली सुरु झाले, त्या नंतर जसे युसर्स ह्या सर्च इंजिन वरती वाढत गेले तसतसे सर्च करताना येणाऱ्या अडचणी गुगल ला दिसू लागल्या आणि सर्च अधिकाधिक सोप्पा होण्यासाठी गुगल अल्गोरीदम्स बनवत गेले. थोडक्यात कॉम्पुटर चे विशेष ज्ञान नसलेल्यांसाठीही surfing सोप्पे व्हावे याकरिता, त्यांच्या engineer s ने implement केलेले प्रोग्राम्स म्हणजेच अल्गोरीदम्स. आजच्या काळामध्ये गुगल हे 'Smart Engine' म्हणून ओळखले जाते . यासाठी आजपर्यंत अनेक अल्गोरीदम्स गुगलने बनविले होते त्यातील काही महत्वाचे अल्गोरीदम्स आपण बघू.
१. पांडा - हा अल्गोरीदम गुगलने फेब्रुवारी २०११ मध्ये रिलिज केला वेबसाईट वरील मजकूर (content) सबंधित पांडा काम करतो. मजकूरचा दर्जा कसा आहे, मजकूर नकली आहे का? keyword stuffing जास्त झाले आहे का हे चेक करायचे काम पांडा करतो. अश्या वेबसाईट गुगल कमी ranking देतो.
२. पेंग्विन - पेंग्विन एप्रिल २०१२ मध्ये गुगलने बनविला. वेबसाईटला चांगले ranking मिळविण्यासाठी 'external linking' ला खूप महत्व असते. ते लिंकिंग आहे की नाही , किती आहे , काय दर्जाचे आहे हे बघण्याचे काम हा पेंग्विन करतो.
३. पिजन - जुलै २०१४ मध्ये पिजन अल्गोरिदम गुगलने implement केला. हा जरा इतरांपेक्षा स्मार्ट अल्गोरिदम आहे युसर्स नक्की कोणत्या location वरून सर्च करत आहे, काय सर्च करत आहे हे जाणून तसे त्या location जवळील ऑफिसेस, मोठी दुकाने, छोटे -मोठे व्यवसाय बद्दल माहिती आपल्याला दाखवतो. ह्याचा व्यवसायिकांना, ऑफिसेसना आपला online presence वाढविण्यासाठी खूप फायदा झाला.
४. पेज लेआऊट - पेज लेआऊट हा अल्गोरिदम वेबसाईटचे डिजाईन चेक करतो तसेच वेबसाईटवर जाहिरातींचे प्रमाण किती आहे, त्या कशा डिजाईन केल्या आहेत त्यानुसार त्यांना ranking देण्याचे काम हा अल्गोरीदम करतो.
५. पायरेट - ह्या अल्गोरीदमच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते की सर्च इंजिनवरील वेब पेजेसचा डेटा म्हणजेच कन्टेन्ट, फोटोस, व्हिडीओज, ओरिजनल आहेत की पायरेटेड हे चेक करायचे काम हा अल्गोरिदम करतो. जर कोणताही पायरेटेड डेटा आढळला तर गुगल च्या पॉलिसीनुसार वेबमास्तर GOOGLE DMCA ला रिपोर्ट फाईल करू शकतात. हा अल्गोरिदम ऑगस्ट २०१२ मध्ये रिलिज झाला.
अश्या प्रकारचे अनेक अल्गोरिदम्सवर गुगल सर्च इंजिन काम करते. हे गुगलचे मुख्य अल्गोरीदमस आहेत नुकताच गूगलने मोबाईल यूसर्स साठी 'Mobile Friendly' अल्गोरीदम अपडेट केला आहे.
Courtesy: Moz.com |